पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी उपचार केले नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने म्हणून तनिषाचा मृत्यू झाल्याचा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला होता. आमदारांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आणि सबंध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात अनेक संघटना आणि पक्षांनी निषेध नोंदवत आंदोलन देखील केली आहे.
आमदार अमित गोरखे यांच्याकडून या प्रकरणी दोन वेगवेगळे वक्तव्ये करण्यात आली. याबाबचे व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या प्रकरणात ‘अमित गोरखे यांचे आपल्या भूमिकेवरून यु टर्न घेण्याचे कारण काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे आपल्या भूमिकेवरून यु टर्न घेण्याचे कारण काय? गोरखे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? गोरखे यांना कुणी, काही आदेश दिले आहेत का? असे विविध प्रश्न राज्याच्या जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही. पण एका आईने जीव… pic.twitter.com/rAnvEMtYqD
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 10, 2025
‘गोरखे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? गोरखे यांना कुणी, काही आदेश दिले आहेत का? असे विविध प्रश्न राज्याच्या जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही. पण एका आईने जीव गमावला आहे याचा संवेदनशीलपणा ठेवायला हवा’, असं जयंत पाटलांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे. अमित गोरखे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत पहिल्यांदा घेतलेली भूमिका का बदलली असा सवाल आता सर्वसामान्यांना देखील पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली, पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
-‘जर रस्ता व्हावा ही इच्छाच असती तर….’, सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
-ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’
-‘त्या’ रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन