पुणे : पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडींचा विचार करता अनेक रस्त्यांवर आता नव्याने उड्डाणपूल करण्यात आले आहे, तर काही पुलांचे काम सुरु आहे. अशातच आता ‘राजाराम पुल ते फन टाईम सिनेमागृह’ या दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ उड्डाणपुल नाव देण्याची मागणी शिवसेना खडकवासला विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी केली आहे.
‘राजाराम पुल ते फन टाईम सिनेमागृह दरम्यान उड्डाणपुल उभारण्यात आलेला असून लवकरच नागरीकांसाठी तो खुला करण्यात येईल. सदर उड्डाणपुलास अद्यापपर्यंत कोणतेही नाव देण्यात आलेले नाही आणि उड्डाणपुलास नरवीर तानाजी मालुसरे असे नाव देण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे करीत आहोत. शालेय पुस्तकातुन तसेच सिनेमाच्या माध्यमातुन पुण्यातील सिंहगड किल्ल्याचा इतिहास परिचीत होत असतो. सिंहगडाची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटनांपैकी एक घटना आहे’, असे महेश पोकळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात छत्रपती शिवाजी महराजांनी मोहीमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्वाचे होते. सिंहगडावर झालेली ही लढाई नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानासाठी ओळखली जाते. नरवीर तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास पुढील काळात येणाऱ्या पिढीला माहिती होण्यासाठी राजाराम पूल ते फनटाईम सिनेमागृह दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास नरवीर तानाजी मालुसरे उड्डाणपूल, असे नाव देण्यात यावे, अशी विनंती महेश पोकळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य
-भल्या सकाळी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदेंच्या खास मिशनवरुन राज संतापले
-गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट
-रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?
-अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल