पुणे : लग्न म्हटलं की विश्वासाचं नातं. लग्न टिकून राहतं ते फक्त विश्वासावर जोरावर. पण एकदा का या विश्वासाला तडा गेला तर मग लग्नगाठही तुटते. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीसोबतच कौटुंबिक हिंसाचार देखील वाढला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात मानसिक आणि शरीरिक हिंसाचार होत येतोच.
पुण्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समलैंगिक असल्याचं लपवून विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर व्यक्तीने तरुणीचा छळ केला आहे. हा प्रकार पुण्यातील वडगावशेरी परिसरात घडला आहे. धक्कादायक म्हणजे विवाह करत असताना आपण समलैंगिक असल्याची बाब मुलाने लपवून विवाह केला.
मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पीडित तरुणीच्या पती, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. समलैंगिक असलेल्या पतीविरोधात आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासू-सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारदार तरुणी वडगाव शेरी परिसरात वास्तव्याला आहे. जुलै २०२२ रोजी तरुणीचा एकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी कुटुंबियांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर मुलीचा छळ करायला सुरुवात केली.
तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. मोटार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली. तरुणीला धमकाविण्यात आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दर्ग्याचे ट्रस्ट स्वतः दर्ग्याच्या बाजूचं अतिक्रमण हटवणार; तणाव निवळणार
-पुणेकरांना आता जलद बससेवा मिळणार; पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० नव्या गाड्या
-पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्याबाबत वसंत मोरेंचं स्पष्ट वक्तव्य
-बेंगळुरु स्फोटाचं पुणे कनेक्शन काय??? रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित पुण्यात असल्याचा संशय
-सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमाला; नणंद-भावजईच्या गळाभेटीची चर्चा