पुणे : पुणे महानगर पालिकेकडून कोट्यावधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांविरोधात मोहिम सुरु केली असून मिळकर वसुली करण्यासाठी पालिकेकडून मिळकत कर थकवणाऱ्या नागरिकांच्या दारात बँड वाजवून संबंधित नागरिकांची मालमत्ता सील केली जात आहे. पालिकेने राबवलेल्या या मोहिमेद्वारे गेल्या १८ दिवसांत २७ मिळकती सील केल्या आहेत. तर ३१७ मिळकत धारकांकडून तब्बल ४० कोटी ६८ लाख रुपयांची वसूली पालिकेकडून करण्यात आली आहे.
पालिकेचा मिळकत कर न भरणाऱ्यांमध्ये अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे. शहरातील २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १४ लाख ८० हजार मिळकतधारकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ ८ लाख ८४ हजार मिळकतधारकांनी सुमारे एक हजार ८४१ कोटी रूपयांचा कर भरला आहे. तर उर्वरीत सहा लाख मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही.
दरम्यान, चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत कर विभागाला २ हजार ७२७ कोटी रुपये कर वसूली करण्याचे पालिकेचे उदिष्ट आहे. यातील ८५० कोटींच्या वसुलीचे उदिष्ट अद्याप बाकी आहे. त्यामुळे कर संकलन विभागाकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. पालिकेने बँड वाजवत मिळकतींना सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. यामाध्यमातून एका दिवसाला तब्बल दोन ते अडीच कोटींची वसुली होत असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी
-पोलीस बांधवांच्या घरांसाठी आमदार रासने आक्रमक; विधानसभेत प्रश्न मांडत पुनर्विकासाची मागणी
-ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कार्यकर्त्याला आणखी काय हवं’
-चेहरा भोळा अन् कुटाने सोळा! प्रसिद्ध बिल्डरचे ४ कोटी लुटणाऱ्या गुडियाला बेड्या