पुणे : पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामार्फत भरती करण्यात येणार आहे. पीपीएम कोऑर्डिनेटर, वरिष्ठ वैद्यकीय सुपरवायजर, टीबी हेल्थ विजिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती असून एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा पीपीएम कोऑर्डिनेटर पदासाठी २० हजार रुपये पगार मिळणार आहे.
सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर पदासाठीही २० हजार रुपये पगार मिळणार आहे. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी १५ हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लीक करा.
या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-काश्मीरमध्ये हल्ला: काश्मीरमधील पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील जोडपे पुढे सरसावले
-फिरायला गेले ते परतलेच नाहीत! कश्मीर हल्ल्यात पुण्याच्या २ जिवलग मित्रांचा मृत्यू
-युपीएससी २०२४चा निकाल जाहीर! पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
-भाजप मंडल अध्यक्ष व्हायचं असले तर DNA…; ‘त्या’ बॅनरची राज्यभर चर्चा
-राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?