पुणे : राज्यात सध्या ऐतिहासिक मुद्द्यांवरुन वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद झाला. हा वाद संपला नसतानाच आता छत्रपती शिवाजी महारांज्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. ‘वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तेथून हटवण्यात यावी’, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. त्यानंतर या प्रकरणामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
“दुर्दैवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिलं जातंय”
“मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नापेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यातून समाजातून तेढ निर्माण होत असून हे चिंताजनक आहे. औरंगजेब कबरीच्या विषयानंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आला आहे. ऐतिहासिक विषय हे जातीविषयक विषय नसतात, तत्कालीन परिस्थितीनुसार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती. जातीच्या जोरावर माणसे निवडली नाहीत. दुर्दैवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिले जाते. अनेक संघटना आणि लोक यावर बोलत आहेत, सरकार, भारतीय पुरातत्व विभागने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारतील कोणालाही घेऊ नये. त्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन शासन त्यामध्ये ज्या भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत प्रामाणिकपणे महाराष्ट्राने राहिलं पाहिजे”, असे भूषणसिंहराजे होळकर म्हणाले आहेत.
“वाघ्या कुत्र्याचा अस्तित्व होतं की नव्हता यावर मी काही बोलणार नाही. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून महाराष्ट्र शासन यांना मला विनंती करायची आहे. शासनाने पुढाकार घेऊन समिती नेमवी. दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या. दोन्ही बाजूच्या इतिहासात अभ्यासाकांना समोरासमोर घेऊन बाजूला ऐकल्या पाहिजे. ती समिती काढता येतोय का हे पहावं”, असेही भूषणसिंहराजे होळकर म्हणाले आहेत.
‘मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटनांना समज द्यावा’
होळकरांनी रायगडावरील शिव समाधी साठी देणगी दिली. होळकरांनी सर्व समाजासाठी काम केलं. साताराचे छत्रपती अजिंक्यतारावर बंधनात होते तेव्हा होळकरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटनांना समज द्यावा. तुकोजी राजे होळकरांनी अनेक विद्यापीठांना आणि शिवस्मारकांना निधी दिला. यामध्ये कोणाचा राजकीय हेतू असेल तर माझा इशारा आहे कोणाचा अजेंडा चालू देणार नाही. ३१ मेला अहिल्याबाई होळकर यांची 300 जयंती आहे यावेळी कोणत्याही गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी.- तुकोजी महाराज इंग्रजांना घाबरत असते म्हणून कुत्र्याचा समजला नाही दिला ही गोष्ट चुकीची आहे. होळकर शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढले. चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाहीत ब्रिगेडला माझा इशारा आहे”, असे म्हणत भूषणसिंहराजे होळकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: भररस्त्यात लघुशंका, अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर
-ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला
-छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो