पुणे : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला धमकावले तिला घरात डांबून ठेवले. ३२ वर्षीय महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३२ वर्षीय पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष रामदास गायकवाड (वय ५५, रा. विठ्ठल मंदिरासमोर, धानोरी), सागर मधुकर लांडगे (वय ३०,रा. गल्ली क्रमांक ३, माधवनगर, धानोरी), तर या प्रकरणी एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. धर्मांतरासाठी महिलेवर अत्याचार केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला ओळखीचे असून आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली. पीडितेला धानोरी परिसरात बोलवले. धानोरी येथील आरोपी महिलेच्या घरात आरोपी संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तिला डांबून ठेवले. यानंतर दोघांनीही पीडितेला पिस्तुलाचा धाक धाकवून जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
आरोपीने महिलेवर बलात्कार केला. या घटनेचा मोबाइमध्ये व्हिडीओ रोकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी सागर लांडगे याने पीडित महिलेला लोहगाव परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले. त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केले, असे पीडित महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे या संदर्भातील अधिकचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदे-पवारांच्या मंत्र्यांवर राहणार वॉच, भाजपच्या नव्या खेळीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार
-…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!
-धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
-Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?
-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं