पुणे : पुणे शहरामध्ये प्रशासनाचे धिंडवडे काढणारा एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील समाधान चौकात एक अख्खा ट्रक हा खड्ड्यामध्ये गेला आहे. रस्ता खचला आणि ट्रक थेट २५ फूट खड्ड्यात गेला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र एक अख्खा ट्रक रस्ता खचून खड्ड्यात गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शहरात मध्यवर्ती भागातील बेलबाग चौकाजवळ सिटी पोस्ट ऑफिस आहे. या ऑफिसच्या आवारामध्ये अचानक पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून संपूर्ण ट्रक थेट खड्ड्यांमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. खड्ड्यात गेलेला हा ट्रक पुणे महापालिकेचा असून प्रसंगावधान ओळखून ड्रायव्हरने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.
पालिकेच्या मैलापाणी वाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक आणि कामगार हे पोस्ट ऑफिस परिसरातील चेंबरचे काम करत होते. मात्र, त्यावेळी ट्रक उभा असलेला रस्ता खचला आणि ट्रकचा केबिनचा भाग सोडता संपूर्ण ट्रक जमिनीत गाडला गेला. पेविंग ब्लॉकने रस्ता माखलेला असताना सुद्धा अचानक खड्डा पडून ट्रक खड्ड्यात गेला. या घटनेनंतर अग्निशामन दलाला माहिती कळवण्यात आली. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ट्रकसोबत दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात गेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आयफोन प्रेमींसाठी खूशखबर; आता घरबसल्या अवघ्या १० मिनिटात आयफोन १६ मिळणार हातात, कसा ते वाचा
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; ओबीसीच्या ‘या’ बड्या नेत्यांने हाती घेतली ‘तुतारी’
-‘त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन’; अजितदादांच्या कट्ट्रर समर्थकांची बंडखोरीची भाषा
-”लाडकी बहिण’साठी शिक्षक, गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक संकटात टाकलं’; राज्य सरकारवर गंभीर आरोप
-कामाच्या अति तणावामुळे पुण्यात २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले, ‘मला आशा आहे की,…’