पुणे : गेल्या ३ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांची सर्व पक्षांचे इच्छुक आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यातील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक प्रलंबित याचिकांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तीवाद सुरु आहे. यासंदर्भात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना दावा केला आहे.
“आता खूप दिवस महापालिका नगरसेवकाविना राहू नयेत. लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकर निकाल देण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. फेब्रुवारीत निकाल आला तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ, व्यवस्था उपलब्ध करून देईल. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहावे”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
पालिका निवडणुकीची भाजपची तयारी
“काहीही करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी. ४ लाख सदस्य शहरातून वाढावेत. प्रत्येक बुथवरून ५ टक्के सक्रिय सदस्य करावेत. सदस्य नोंदणीसाठी शहराचे दोन जिल्हे करावेत. महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे. त्यामुळे स्थानिक कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे असा निर्णय घेतला आहे. पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय रहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवेत यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“दादा बोलले असतील तर फायनल…”, पालिका निवडणुकीबाबत सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य
-Delhi Vidhansabha: “…तर भाजपच्या २० जागा आल्या नसत्या”, शरद पवारांच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
-आई म्हणावं की कसाई; पोटच्या चिमुरड्यांचा गळा आवळला, अन्…
-पुण्याच्या गुन्हेगारीला बसणार चाप; पुणे पोलिसांनी आखली ‘ही’ मोठी योजना
-पोलीस दलात मोठी खळबळ; पीएसआयने संपवलं जीवन, नेमकं कारण काय?