पुणे : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास सर्व महिलांच्या खात्यामध्ये प्रतिमहिना १५०० रुपये जमा होत आहेत. अद्यापही ही योजना सुरु आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून महिलांसाठी आणखी एक खास गिफ्ट दिलं जाणार आहे.
येत्या १ नोव्हेंबर पासून १ हजार माता-भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी मोठी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये ७ हजारपेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते कन्यापूजन पार पडले.
या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या २ घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे राज्यात दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि दुसरी घोषणा म्हणजे १ हजार माता-भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार असून थेट टाटा कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. इतकंच नव्हे तर टाटा कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना एक वेळचं जेवण आणि नाश्ता देखील दिला जाणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.
आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राजकारणात कोण कुठे होता अन् कुठे असेल, काहीच सांगता येत नाही’- संभाजी राजे छत्रपती
-दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात नव्याने ७ पोलीस स्टेशन सुरु; गुन्हेगारीला बसणार आळा