पुणे : दरवर्षीप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी पुस्तक महोत्सव हा 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी झाले. या पुस्तक महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन, लेखकांचे संवाद, शालेय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये पुस्तकांबरोबर वाचनाचे महत्त्व, साहित्याची गोडी यांवर चर्चा केली जाते. पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळत असते.
पुणे पुस्तक महोत्सवाला फक्त पुणेकरांचाच नाहीतर देश विदेशातील अनेक लोकांचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पहिल्या दोन-तीन दिवसात हजारो लोकांनी या पुस्तक महोत्सवाला उपस्थिती लावली. हे पुणे पुस्तक महोत्सव पुण्यातील नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण देशभरातील वाचक प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
वाचन, लेखन, संगीत, नाट्य, काव्य अशा विविध साहित्य प्रकारांवर आधारित उपक्रमांचे आयोजन या पुस्तक महोत्सवात केले आहे. तसेच 600 हून अधिक दालने, 100 साहित्यिक सत्रे, पुस्तक प्रकाशन आणि चर्चासत्रे, मान्यवरांच्या चर्चा, मुलांसाठी 50 हून अधिक उपक्रम, आणि नामवंत व्यक्तीच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम, आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडणार महागात; वाचा काय आहे शिक्षा?
-कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक
-धक्कादायक! बिर्याणी बनली मित्राच्या खूनाचं कारण; नेमका काय प्रकार?
-मंत्रिमंडळ विस्तार होताच पुण्यातील ‘त्या’ स्मारकाबाबत मोठा निर्णय; संरक्षित स्मारकाचा दर्जा देणार
-‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी