पुणे : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपच्या मंत्र्यांमध्ये देखील अंतर्गत वाद असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. पुण्याचा कारभारी होण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.
आमदार माधुरी मिसाळ आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमुळे पक्षात दुफळी असल्याचे चित्र पहायला मिळालं असून हा मुद्दा आता राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार मिसाळ आणि खासदार मोहोळ यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे. शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ आणि मिसाळ यांनी स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या.
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. तर सलग चार वेळा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. या दोन्ही राज्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
गेल्या आठवड्यात मुरलीधर मोहोळ यांनी विकासकामांचा आढावा घेतला. बोलावलेल्या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, शहरातील आमदार, माजी नगरसेवक हजर होते. या बैठकीला मिसाळ गैरहजर होत्या मात्र, त्यानंतर आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी वेगळी बैठक घेतली. या बैठकीला त्यांच्या गटाचे माजी नगरसेवक उपस्थित होते. या वेगवेगळ्या बैठकांवरुन शहरावरील आपलं वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्न दोन्ही मंत्र्यांकडून सुरु असल्याचं बोललं जात आहेत. त्यामुळे आता पक्षातील एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एकाच पक्षातील २ मंत्र्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्याची चर्चा रंगू लागल्याने मिसाळ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “कारभारावरुन आमच्यात मतभेद नाहीत. त्यादिवशी मला ऐनवेळी एका बैठकीला जावं लागलं. त्यामुळे मी महापालिकेतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला हजर राहू शकले नाही. केंद्रीय मंत्र्यांनी ती बैठक घेतली. कारण सगळ्यांनाच शहरासाठी आपण काहीतरी करायला हवं असं वाटतं”, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण
-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले
-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’