पुणे : पुणे शहरामध्ये सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. शहरातील अनेक भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिंहगड रस्त्यावर २ उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यातील एका उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याच उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
वाहतूक कोंडी आटोक्यात कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करुन तो पूल नागरिकासांठी खुला करण्यात यावा अशी मागणी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशातच प्रशासनाकडून या उड्डाणपूलाचे काम अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, यावरही विरोधकांनी गंभीर आरोप केला जात आहे. भाजपला या उड्डाणपुलाचे उद्घाटन हे बड्या नेत्याच्या हस्ते करायचे आहे. त्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यास विलंब केला जात आहे, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांनी देखील या उड्डाणपूलावरुन लाईव्ह करुन नागरिकांसाठी तातडीने सुरु करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा’, खड्डानाथ, खड्डादादा अन् खड्डेंद्र…; पुण्यात काँग्रेसची बॅनरबाजी
-विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला
-‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?
-पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद
-पुण्यात पुन्हा पूरस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या आदेश येताच शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला!