पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पठारे हे हाती तुतारी घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बापू पठारे यांनी जाहीर केले आहे.
बापू पठारे हे गणेशोत्सवाच्या पहिल्यात दिवशी गणेश मंडळांना भेट देताना विधानसभा निवडणुकीसाठी आपण तुतारी हातात घेणार असल्याचे सांगितले आहे. बापू पठारे यांनी तुतारीचा प्रचारही सुरु केला आहे. त्यांनी गणेश मंडळांना तुतारीला मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीकडून अजित पवार गटाकडून तेच पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीमधील अनेकांनी सुनील टिंगरे यांना विरोध केला. वडगाव शेरी हा मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?
-विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता
-भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; नेमका काय प्रकार?