पुणे : लाडक्या गणरायाचं आज आगमन होत आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे शहरात जल्लोषाचं वातावरण आहे. सर्व गणेशभक्तांनी शहरातील रस्ते गजबजून गेले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्वभूमीवर मध्यभागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी २८ छिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शहराच्या मध्यभागात मानाच्या गणपतींचे दर्शन, तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते. उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना मोटारी, तसेच दुचाकी लावण्यासाठी २७ ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.
अशी असेल मोटारी आणि दुचाकी वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, (दुचाकी ,चारचाकी), एच. व्ही. देसाई महाविद्यालय, (पोलीस पार्किंग), हमालवाडा, नारायण पेठ, (दुचाकी, चारचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ, (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर, (दुचाकी, चारचाकी), स. प. महाविद्यालय, (दुचाकी, चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग, (चारचाकी), पेशवे पार्क, सारसबाग, (दुचाकी), हरजीवन हाॅस्पिटल, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक, (दुचाकी)
पर्वती ते दांडेकर पूल, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा, (दुचाकी), गणेश मळा ते राजाराम पूल, (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह, (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, (दुचाकी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, (दुचाकी, चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता, (दुचाकी, चारचाकी) आपटे प्रशाला, (दुचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय, (दुचाकी, चारचाकी), जैन हाॅस्टेल, बीएमसीसी रस्ता, (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय, (दुचाकी), पेशवे पथ, (दुचाकी), रानडे पथ, (दुचाकी, चारचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर, (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, (दुचाकी, चारचाकी), नदीपात्र, भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी, चारचाकी)
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?
-वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी
-वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकणार?; वडिल सुर्यकांत आंदेकरांनी घेतली शपथ
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?