पुणे : पुण्यातील कोरिंथियन क्लबमध्ये बियर तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या कंपनीने राज्य शासनाचा कर भरला नाही. या कंपनीने तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ रुपयांचा राज्य सरकारचा कर बुडवला आहे. या प्रकरणी राज्यकर विभागाने विभागाने या कंपनीवर कारवाई करत २ संचालकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संचालक सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी यांनी महाराष्ट्र मूल्यवर्धीत कर कायदा २००२ च्या कलम २० चे उल्लंघन केले. त्यांनी विवरणपत्र सादर केले नाही. याबाबत जीएसटीकडून कंपनीला वारंवार पत्र व नोटीस देऊन सूचित करण्यात आले होते. राज्य मूल्यवर्धीत कर कायदा २००२ ची प्रलंबित थकबाकी न भरल्याप्रकरणी ब्रुकाष्ट माइक्रो प्रायव्हेट लिमिटेड या बिअर कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या कर विवरणपत्रात कर भरल्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात कर जमा केला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
सुकेतू दत्तात्रय तळेकर (रा. बांद्रा) आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक साहेबराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ‘फिर्यादी दीपक शिंदे हे येरवडा येथील वस्तू व सेवाकर भवनमध्ये राज्यकर निरीक्षक म्हणून काम करतात. ब्रुकाष्ट माइक्रो ब्रुइंग ही कंपनी हॉटेल्समध्ये जागेवरच बिअर तयार करण्याचे काम करते’, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी माहिती दिली आहे.
आलिशान हॉटेलमध्ये बिअर आणि अन्नपदार्थ विक्रीचेही काम कंपनीमार्फत केले जाते. या कंपनीमार्फत हडपसर येथील महंमदवाडीतील ‘कोरिंथियन क्लब’ देखील चालवला जातो. तेथेच बिअर तयार केली जाते, अशीही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | उमेदवारानं मत मागण्यासाठी लढवली नवी शक्कल; वस्तारा हातात घेत म्हणाला,…
-प्रचार करावा तर असा…! तात्यांनी ससून रुग्णालयाला भेट दिले उंदराचे पिंजरे, सर्वत्र होतेय चर्चा
-सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका
-Election Commission इन ॲक्शन मोड! ओपिनियन आणि एक्झिट पोलबद्दल मोठा निर्णय