पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. तर इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचंं पहायला मिळत आहे. अशातच सध्या वडगाव शेरी मतदारसंघात मोठा राजकीय राडा सुरु आहे.
वडगाव शेरी मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. वडगाव शेरीचा मतदारसंघ मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह ठाकरेंच्या शिवसेना देखील आग्रही आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून इच्छुक असणारे ठाकरेसेनेचे नितीन भुजबळ यांच्याकडून मतदारसंघात मोठे बॅनर लावण्यात आले. भुजबळ यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘जनतेचं ठरलंय, वडगाव शेरीत मशालाच’ असं म्हणत आपल्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे.
समाजकार्याच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेले नितीन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याच्या जोरदार चर्चा आहेत. गेल्या काही दिवसांपूसन राजकारणात नवा चेहरा या मतदारसंघाला हवा असल्याची कुजबूजही सुरु आहे. महाविकास आघाडीकडून वडगाव शेरी मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेच्या भुजबळांसह माजी नगरसेवक संजय भोसले तसेच उपनेत्या सुषमा अंधारे हे नेते देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ठाकरेंच्या इच्छुकांची संंख्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या आणि त्यात आता भुजबळ यांची बॅनर बाजी यावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आता महाविकास आघाडीत या मतदारसंघाबाबत काय निर्णय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळेंचं मिशन पिंपरी-चिंचवड; थेट अजिदादांना डिवचलं, म्हणाल्या ‘आधी शहराचा कारभारी…’
-पर्वतीसाठी बागुलांचा गनिमी कावा, काँग्रेस नेत्यांनंतर थेट शरद पवारांची भेट; नेमकं चाललंय काय?
-पुणे-बेंगळुरू बायपाससाठी ३०० कोटींचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील
-Assembly Election : राष्ट्रवादी-भाजपच्या वादात शिवसेनेची उडी; कोणत्या मतदारसंघावर केला दावा?