पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. उद्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचाराची वेळ संपली असली तरीही पुण्यात मात्र अजूनही प्रचार संपल्याचे दिसत नाही. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या ट्रिक्स अवलंबण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काल संध्याकाळी ६ पर्यंतच राज्यातील उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी होती. त्याप्रमाणे अनेक पक्षांकडून सांगता सभेने प्रचाराचा शेवट करण्यात आला. मात्र पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ, वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात चौकांमध्ये फ्लेक्स लावले आहेत.
मतदारसंघात लावलेल्या फ्लेक्सवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवारच नाव, कोणत्याही नेत्याचा फोटो नाही. मात्र पक्षांची ब्रीदवाक्य वा प्रचाराच्या ओळी लिहिल्या गेल्या आहेत. मतदारसंघात यावरुन आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-जरांगेंचा फोटो अन् मराठा उमेदवार ओळखण्याचं आवाहन, कसब्यात लागलेल्या बॅनर्सची शहरात चर्चा
-महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात
-पुण्यात पैसे, सोन्याने भरलेला ट्रक त्यानंतर आता सापडलेल्या ट्रकमध्ये काय सापडलं?