पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अगरवाल यांचे चिरंजीव १७ वर्षीय वेदांत अगरवाल हा दारुच्या नशेत आपली अलिशान पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत होता. मध्यरात्री २- अडीचच्या सुमारास त्याच्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये तरुण, तरुणीचा जीव गेला. मात्र आरोपीला न्यायालयाने १५ तासांच्या आतच जामीन मंजूर देखील केला.
आरोपी वेदांत अगरवाल याला आज न्यायाधीश धनवडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. या वेळी वेदातंचे वकील प्रशांत पाटील यांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी जे कलम लावण्यात आले आहे. त्यामधे जामीन मिळण्याची तरतूद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने वेदांतला जामीन मंजूर केला असला तरीही काही प्रमुख अटी व शर्ती वेदांतला घातल्या आहे.
त्यानुसार, पहिलीच अट ट्रॅफिक पोलिसांसोबत चौकात उभे राहून १५ दिवस वाहतुकीचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले आहे. वेदांत अगरवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अगरवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत. वेदांत अगरवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल, अशा अटी व शर्ती वेदांतला न्यायालयाने घातल्या आहेत.
बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला आरोपी वेदांतला आज न्यायालयामध्ये हजर केले असता पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीच्या बाजूने भूमिका मांडताना वेदांतचा जामीनाला विरोध केला होता. अपघात झाला तेव्हा वेदांत हा दारुच्या नशेत होता. आरोपीविरुद्ध लावण्यात आलेल्या कलमातील तरतुदीनुसार वेदांत जामीनास पात्र असल्याने त्यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे
-पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल
-…अन्यथा बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही; बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर
-Kangna Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड क्षेत्र सोडून देणार’; कंगना रणौतचा मोठा निर्णय