पुणे : पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक शुक्रवारी (ता. २०) रोजी २५ फूट खड्ड्यात पडला. यावरुन पालिकेच्या कारभारावर तसेच सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. शहरातील समाधान चौक भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारामध्ये ही घटना घडली होती. त्याप्रकरणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.
ट्रक पडलेला खड्डा हा अंदाजे २५ फूट खोल होता. या घटनेनंतर अनेक इतिहासप्रेमींनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. पुण्यातील इतिहास प्रेमी आणि हेरिटेज तज्ज्ञ संदीप गोडबोले यांनी एक्स सोशल मीडियावर एक जुना नकाशा शेअर केला. या नकाशावर १८०० च्या दशकात समाधन चौकाजवळ एक गोलाकार विहीर दर्शवलेली होती. त्यावेळी लक्ष्मी रोड अस्तित्वात नव्हता.
हे सिंकहोल त्या जुन्या विहिरीमुळेच निर्माण झाले असावे. १९६० च्या दशकातील नकाशा दाखवतो की, लक्ष्मी रोड आणि सिटी पोस्ट ऑफिस असले तरी विहिरीचे कोणतेही चिन्ह नव्हते. यावरून असे दिसून येते की, १८०० ते १९६० च्या दरम्यान ही विहीर बंद करण्यात आली असावी, परंतु त नीट बंद न झाल्यामुळे सिंकहोलचा त्रास उद्भवला असावा, असे मत व्यक्त केले आहे.
घटनास्थळी तपास करताना जुन्या विहिरीचे काही चिन्ह आढळले आहेत, आणि या विहिरीचे अवशेष या सिंकहोलसाठी कारणीभूत असू शकतात, असे म्हणत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंनीही या मताला दुजोरा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी, चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत मिठाचा खडा; काय असणार राजकीय गणितं?
-“जनतेचं ठरलंय! वडगाव शेरीत मशालच…” ठाकरेंच्या शिलेदराचे झळकले बॅनर्स
-सुप्रिया सुळेंचं मिशन पिंपरी-चिंचवड; थेट अजिदादांना डिवचलं, म्हणाल्या ‘आधी शहराचा कारभारी…’
-पर्वतीसाठी बागुलांचा गनिमी कावा, काँग्रेस नेत्यांनंतर थेट शरद पवारांची भेट; नेमकं चाललंय काय?