पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरन पुनावाला यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी ही मागणी केली. कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी ही मागणी केली आहे.
‘लस निर्मितीच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान फारच महत्त्वाचं आणि मोठं आहे. त्यांचं योगदान लक्षात घेऊन सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, त्यांना भारतरत्नही द्यावा, हीच माझी केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे. भारतरत्न हा पुरस्कार सायरस पुनावाला यांना मिळावा. ही विनंती करतो’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
‘कोरोनासह विविध आजारांवर मात करण्यासाठी ‘एसआयआय’च्या लस निर्मितीवर सायरस पुनावाला यांनी भर दिला. त्यांच्या या मोलाच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण जगाला सीरमने तयार केलेली लस देण्यात आली होती. विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये जिथे लसीची नितांत गरज होती. सीरम इन्स्टिट्यूटने ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली होती. ही लस वितरित करण्यात आली आणि त्यासाठी सायरस पूनावाला आणि त्यांच्या टीमनं लोकांच्या सेवेची जबाबदारी स्वीकारली’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बापाने घेतलेल्या पैशाची वसूली अल्पवयीन मुलीकडून; १५ दिवस लॉजवर डांबून गिऱ्हाईकं पाठवलं
-पुण्यात बॅनर: सुप्रिया सुळेंनंतर आता जयंत पाटलांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख
-गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण
-अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक
-पुणे पोलीस दलात बेशिस्तपणा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय