पुणे : पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात दररोज बलात्कार, खून, चोरी, दहशतवाद पसरवणे, अमली पदार्थांचे खरेदी-विक्री, अवैद्य धंदे यांसारखे गुन्हे घडत असतात. अशातच औंध भागातील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या कारवाईत थायलंडमधील ४ तरुणींसह ९ जणींना ताब्यात घेतले आहे. मसाज पार्लर मालकासह चौघांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंधमधील मुरकुटे प्लाझा इमारतीतील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या व्यवसायाची खात्री केली. पोलिसांच्या पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील ४ तरुणी, तसेच महाराष्ट्र, गुजरातमधील ५ तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
औंध पोलिसांनी चौकशीत तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाया करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये मसाज पार्लरचा मालक, व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहर तसेच उपनगरातील मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला आहे. मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज
-एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच
-मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!