पुणे : मराठी वाहिनीवरील मराठी मालिका, कार्यक्रमांचे प्रोमो ‘कलर्स मराठी’कडून प्रदर्शित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २२ एप्रिलला स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेला सुरू होऊन आठवडा पूर्ण होताच ‘कलर्स मराठी’ने नव्या मालिकेची घोषणा केली आहे.
कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर पेजवरुन कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांचे प्रोमो शेअर केले जातात. त्यातच आता आणखी एक नवी मालिका सुरु होत आहे. ‘अंतरपाट’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. “नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट,” असं कॅप्शन लिहित कलर्सने नव्या मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो शेअर केला आहे. ‘अंतरपाट’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अशोक ढगे असणार आहेत. अभिनेत्री रेशम टिपणीसही आहे.
View this post on Instagram
अतंरपाठ या मालिकेमच्या प्रोमोमध्ये हळदीचा कार्यक्रम सुरु असल्याचे दाखवले. घरात लग्नकार्य असल्याने आनंदाचे वातावरण आहे. वधू देखील आनंदी असून लव्ह मॅरेजच्या काळात अॅरेंज मॅरेज करतेय, मला जोडीदार परफेक्ट मिळाला आहे. किती वर्ष लग्नाची स्वप्ने पाहिले असल्याचे मालिकेची अभिनेत्री रश्मी अनपट सांगते. तर, दुसरीकडे मालिकेचा नायक हा उदास चेहऱ्याने आपल्या बेडवर पडलेला असतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना ही नेमकी काय स्टोरी आहे हे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन
-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष
-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?
-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार