पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांची पुण्यातील सभा ही येत्या २९ एप्रिल रोजी सर परशुराम महाविद्यालयाच्या (एसपी कॉलेज) मैदानावर होणार होती. पण आता या सभेचे ठिकाण बदल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही सभा पुण्यातील रेसकोर्सच्या मैदानावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण व्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
शहरातील रेसकोर्सच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात येणार आहे. २९ एप्रिलला संध्याकाळी महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील स.प. महाविद्यालय हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगची सोय होणार नाही. पंतप्रधान मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता भाजपकडून सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदींच्या सभेला होणारी गर्दी आणि वाहतुकीचादेखील मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सभेसाठी होणाऱ्या गर्दीमुळे इतर पुणेकरांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून मोठ्या मैदानावर ही सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण सुरक्षा बाळगली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ससूनमधील मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो दाखवत अजित पवारांनी काढले वाभाडे; तरीही कारवाई नाहीच
-शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!
-पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
-शिरूरमध्ये मनसे आढळराव पाटलांच्या साथीला! मनसे पाठिंब्याने ताकद वाढली