पुणे : पुणे शहरामध्ये अनेक भागात मेट्रोचे काम सुरु आहे. काही भागातील मेट्रोचे काम पूर्ण झाले असून पुणेकर मेट्रोने सुखाचा प्रवास करत आहेत. तसेच आता शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गाचे काम पूर्ण झाले असून स्वारगेट ते कात्रज पर्यंतच्या मार्गाला मान्यता मिळाली आहे. भूमिगत मार्गाचे आणि नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
येत्या २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदींची शिक्षण प्रसारक मंडळी स.प. महाविद्यालयाच्या (एसपी कॉलेज) मैदानावर सभा होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत मुख्य सचिवांची बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक झाली.
या बैठकीत मोदींच्या पुणे दौऱ्यामधील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याचबरोबर आता नरेंद्र मोदींचा पुणे दौऱ्याबाबत अंतिम बैठक होणार असून कार्यक्रमाच्या नियोजनांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: महाविकास आघाडीत रस्सीखेच; पुण्यातील ८ जागांवर ठाकरे गटाचा दावा
-‘…तर तुरुंगातच टाकतो’; ‘लाडकी बहिण’वरुन अजित पवारांनी दिला सज्जड इशारा
-अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?
-विधानसभेसाठी अजित पवारांच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर; बारामतीमधून कोण लढणार?