पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील नव्या मेट्रो मार्गिकेचं तसेच विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन, उद्घाटन होणार होते. शहरातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांची जंगी सभा देखील होणार होती. मात्र शहरात पडलेल्या पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला.
एस. पी. कॉलेज मैदानावर आयोजित केलेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र- मोदींचा सन्मान करण्यासाठी एक वैशिट्यपूर्ण पगडी घालून सन्मानित करण्यात येणार होतं. मोदींच्या सन्मानित करण्यासाठी एक खास ‘संत तुकाराम महाराज’ अशी पगडी तयार करण्यात आली आहे.
मोदींचा दौरा रद्द झाल्याने पुण्यातील भाजप कार्यकर्ते नाराज झाले असून ही खास पगडी मोदींच्या पुढील दौऱ्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी भाजपकडून पुण्यात जोरदार तयारी करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींना पुणे दौऱ्यावर असताना नेहमीच विशेष पगडी घालून सन्मानित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींचा दौरा रद्द; मविआ आक्रमक, उद्याच करणार मेट्रोचं उद्घाटन
-मोदींचा दौरा रद्द, पण अजितदादांनी पहाटेच केली मेट्रोच्या कामाची पाहणी
-ना भाई, ना ताई! कसब्यात काँग्रेसमध्ये वाद पेटला, धंगेकर समर्थकांच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण
-शरद पवार करणार अजितदादांची कोंडी; ‘त्या’ १२ मतदारसंघात लावली जोरदार फिल्डींग