पुणे : हरियाणा निवडणूक निकालानंतर आता महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. Aनिवडणुकीसाठी गाठीभेटी, मुलाखती, दौरे, पक्षप्रवेश अशा राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.
अशातच काल(मंगळवारी) मोदी बागेत सकाळी एका बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला होता. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाणारा हा बडा नेता नेमका कोण? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आता रंगली आहे. आता हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक मोठे धक्के दिले आहेत. नुकताच भाजपला मोठा धक्का देत हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेत इंदापूरमधून उमेदवारी देखील दिली आहे. तसेच अजित पवारांचे देखील कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत अनेकांना आपल्या गळाला लावत अजितदादांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. आता सुप्रिया सुळेंच्या गाडीतील नेता हा नेता शरद पवारांच्या पक्षात गेला तर अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा
-शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!
-जय शंभू महादेवा! बिग बॉस विजेता सुरज चव्हाण घरी जाण्याआधी पोहचला जेजुरी गडावर
-कार्यकर्त्यांनी केली उमेदवारीची मागणी; अजितदादा म्हणाले, ‘इथं मी मंत्री असून…’