पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत्या २९ तारखेला येणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान मोदींच्या पुणे शहरातील रेस कोर्सच्या मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. मात्र, अद्याप अधिकृत दौरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाला शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नव्हता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष सुरक्षा पथक हे पुणे शहरात दाखल झाले आहेत. विशेष सुरक्षा पथकाकडून सभेच्या ठिकाणचे तसेच पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गाची पाहणी करण्यात येत आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी हे सोमवारी सकाळी महायुतीचे उमेदवार भाजपचे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ (सातारा) कराड येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रेसकोर्स येथील मैदानात जाहीर सभा होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची शहरात वाहनातून प्रचारफेरी होणार आहे. मात्र, या प्रचारफेरीचा मार्ग अद्याप राजशिष्टाचार विभागाला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत कळविण्यात आलेला नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच राजभवन येथे रवाना होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे तिथे काय उणे! नोकरीला लाथ मारत, बॉसला दिली खुन्नस; ढोला-ताशा वाजवत जल्लोषात कंपनीतून एक्झिट
-‘केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार’; सुनेत्रा पवारांचं जनतेला आवाहन
-“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”
-“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”
-‘मी डमी नाही डॅडी उमेदवार’; आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंच्यात डमी उमेदवारावरुन जुंपली