पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे-सातारा रस्त्यावर नसरापूर फाटा येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे सातारा रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली असून, पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.
पुणे-सातारा नसरापूर येथील चेलाडी फाटा परिसरात बुधवारी संध्याकाळी ५ वाजता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित राहणार आहेत.
‘महायुतीच्या या सभेची तयारी सुरू असल्याने पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाटा परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. वाहतूक नियोजन करण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे’, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आढळराव पाटील फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत’; अमोल कोल्हेंचा आरोप
-“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली, म्हणून…”; अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
-पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली
-वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प पथदर्शी ठरणार – मोहोळ