पुणे : महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाक मोठी घडामोड घडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैर असणारे महायुतीमुळे एकत्रत्र यावे लागले आहे. त्यामुळे एकत्रित असूनही अनेक नेते एकमेकांवर नाराजी व्यक्त करताना दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनील शेळकेंच्या एका वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
‘लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो’. असं वक्तव्य आमदार सुनील शेळकेंनी केलं आहे. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर हे वक्तव्य केलं आहे.
महायुतीकडून बारणेंचा प्रचार योग्य रित्या सुरुये का? याबाबत ही शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. ‘मला ढकलून देण्याचं नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावून ठेवलाय’, असं म्हणत सुनील शेळके यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला ही डिवचले आहे. “माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगलं आहे, ते पुढच्या २५ वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही’, असं म्हणून गेल्या २५ वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला पटलं नाही”, हे देखील शेळकेंनी बोलून दाखवलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्ही सून असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही’; अजित पवारांनी पुन्हा काकांना डिवचलं
-“ईव्हीएमचे बटन कचाकचा दाबा पण, बटन दाबताना हात आखडता घेतला तर माझा पण…”- अजित पवार
-पुणे लोकसभेच्या मैदानात AIMIM ची एन्ट्री! तगडा उमेदवार देत काँग्रेससह धंगेकरांची डोकेदुखी वाढवली
-Shirur Lok Sabha | ‘…तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते’; मोहिते पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
-“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा