पुणे : ठाकरे (शिवसेना) आणि राणे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सणसणीत टीका करण्यात आली आहे. खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवरुन आता भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. प्रवीण दरेकर आज पुण्यामध्ये आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘संजय राऊत यांचा घोडा बेफाम सुटला आहे. त्यांना वेसण घालण्याची गरज आहे. शिवसेनेचा कोकणमधून बेस हलला आहे. भिवंडी सोडून १०० टक्के महायुतीला यश मिळाले आहे. त्यामुळे वैफल्यातून संजय राऊत वक्तव्य करत आहेत. आमच्या पक्षांमध्ये कोणाला मंत्री करावे आणि कोणाला करू नये, याची चिंता संजय राऊत यांनी करू नये. सुनील राऊत तयार होते, त्यांचे आधी उत्तर द्या मग आम्ही उत्तर देऊ’, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
नारायण राणे यांच्या कोकणच्या नेतृत्वावर कुणी शंका घेण्याचे कारण नाही. त्यांनी निर्विवादपणे कोकणचे नेतृत्व केलेय. एखादे यश, अपयश आले असेल. परंतु कोकणच्या विकासातील एक महत्वाचा नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा निश्चितच आहे. म्हणून बाप तो बाप असतो, नेता तो नेता असतो, अशा प्रकारचे… pic.twitter.com/NOFDnTgTTn
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 17, 2024
‘संजय राऊत यांना अजिबात सिरीयस घेण्याची गरज नाही. ते उठल्यानंतर किंवा रात्री झोपतानाच कोणता आरोप करायचा, असा विचार करत असतात. आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत आहे’, असा खोचक टोला प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता बारमध्ये बसून दारु पिण्यासाठीही लागणार ‘हे’ सरकारी दस्ताऐवज
-मुलींना मोफत शिक्षण यंदापासूनच! सरकारची संपूर्ण तयारी, नेमकी कधी होणार अंमलबजावणी? वाचा
-महाराष्ट्र्रात मान्सूनची वाटचाल मंदावली, ‘या’ राज्यात अलर्ट जारी!
-दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर