पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. महायुतीने राज्यात मिळवलेल्या यशामुळे विधानसभेत विरोधीपक्ष हा म्हणायला सुद्धा राहिला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी पडताळणीसाठी प्रशांत जगताप यांनी अर्ज केला आहे.
प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याबाबत काही पुरावेही सादर केले. हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 12 लाख 74 हजार रुपये शुल्कही त्यांनी चलनाच्या माध्यमातून जमा केले आहेत.
“कोण आमदार होणार, कोणाची सत्ता येणार एवढ्या पुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. जनतेच्या मतांची झालेली चोरी थांबवणे, लोकशाहीचे सुरु असलेले वस्त्रहरण रोखणे, या प्रकरणात दोषी असलेल्या देशद्रोही लोकांवर कडक कारवाई करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधानावर श्रद्धा असलेला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा न्यायालयीन पातळीसह रस्त्यावरही सुरुच असेल. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि या लढ्यातून नक्कीच न्याय मिळेल” असा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण; शरद पवारांनी घेतली भेट
-मुख्यमंत्रिपदाबाबतच्या ‘त्या’ चर्चेचा मुरलीधर मोहोळांनी केला खुलासा
-‘कोणत्याही पदाची जबाबदारी दिली तरी…’; सुनील शेळकेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
-पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या विजयी आमदारांची चंद्रकांत पाटलांनी घेतली सदिच्छा भेट