पुणे : जेष्ठ पत्रकार निखिलजी वागळे, अॅड.असीम सरोदे, विश्वंभर चौधरी तसेच महिला, युवती व कार्यकर्त्यांवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
“पुण्यात काल झालेला हल्ल्यात फक्त भाजप नाही तर अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील सहभागी होते. अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या समोर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोधात मी स्वतः तक्रार दाखल करणार आहे, न्यायालयात जाऊन स्वतः साक्ष देईन”, अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.
“मी आणि माझे कार्यकर्ते निखिल वागळे यांना संरक्षण देत होतो. वागळेंना संरक्षण देणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण केली. तिन्ही पक्षांचे गुंड पुण्यात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे.
“तिन्ही पक्षाच्या या कर्यकर्त्यांवर तिन्हीही पक्षाचे नेते काय कारवाई करणार? हा माझा प्रश्न आहे. पुणेकरांमध्ये भय निर्माण करण्याचं काम तिन्ही पक्षाचे नेते करत आहेत. फडणवीस गुंडांची पाठराखण करत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करत आहेत. पुण् पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण पुणे पोलिसांना धाक दाखवून पुण्यात गुंडांची टोळी निर्माण करु पाहत आहेत. फडणवीसांना पुणे हे गुंडांचं राज्य तयार करायचं आहे”, असा गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं”
-“तुझ्या बापाने पाहिला का माझ्याबरोबर काँन्ट्रॅक्टर”; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर अजितदादा भडकले
-निखिल वागळेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाई; धीरज घाटेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल
-“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे