मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने नुकतीच एका मुलाखतीत राजकीय वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आधारित बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘कोणावर बायोपिक करायला आवडेल?’ असा प्रश्न प्रसादला एका मुलाखतीत विचारला होता. त्यावर प्रसादने शरद पवारांचे नाव घेतले आहे.
प्रसाद ओक काय म्हणाला?
“अशा बऱ्याच भूमिका आहेत. ज्या मला साकारायला आवडतील. मला सदाशिवराव पेशवेंची भूमिका साकारायला आवडेल. अण्णा हजारे, वपु काळे, जब्बार पटेल साकारायला आवडतील. शरदचंद्रजी पवार यांची भूमिका साकारायला आवडेल. त्यांचा बायोपिक दिग्दर्शित करायला आवडेल. ते महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत,” असं प्रसाद ओक म्हणाला आहे.
प्रसाद ओकने अनेक मराठी नाटकं, सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रसाद ओकने केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसादने आपल्या अभिनयामुळे अनेक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातच प्रसादने सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ हे सिनेमे प्रचंड गाजले. आता प्रसाद ओकने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु
-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत