पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. अशात “लोकसभेची निवडणुकीचा संग्राम हा देश एकसंघ मानणारे विरुध्द देशाचे उत्तर दक्षिण असा भेद निर्माण करणार्यांमध्ये आहे. राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम मानणार्यांमध्ये हा संघर्ष आहे” असे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत. पुणे येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर, सहप्रसिध्दी हेमंत लेले,पुष्कर तुळजापुकर यावेळी उपस्थित होते.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षामध्ये केलेल्या कामामुळे देशाची आर्थिक प्रगती झाली आहे. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहचल्या आहेत. त्यामुळे मोदींवर लोकांचा विश्वास अधिक वाढला असल्यामुळे यावेळी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला मोठे बहुमत मिळणार आहे. देशामध्ये रेल्वे, बंदरे, जलमार्ग आणि विमानतळे अशा पायाभुत सुविधांमध्ये मोदी सरकारने मोठे काम केले आहे. देशात प्रत्येक कुटूंबापर्यंत विकास पोहचला’ असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.
देशामध्ये ७७ लाख लोकांकडे आज इंटरनेटची सुविधा आहे. जगात सर्वात स्वस्त डेटा हा भारतात मिळतो.नागरिकांच्या थेट खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे जमा केले जातात. ३४ लाख कोटी रुपये मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात जमा केले त्यामुळे मोदींना मत जनता देणार आहे. ३५ कोटी युवक आणि महिलांना मुद्रा कर्ज योजनेमुळे २० कोटीहून अधिक रोजगार निर्माण झाले. यामध्ये देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असल्याचे जावडेकर म्हणाले आहेत.
विरोधी पक्ष सध्या एनडीएला २७२ पर्यंत रोखण्याची भाषा करत आहे. त्यांच्यामध्ये निराशा असून पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा प्रकारची विधाने केली जातात. विरोधक खोटा प्रचार करत आहेत. विरोधकांच्या प्रचाराला हितसंबधी गट देशातून आणि विदेशातूनही मदत करीत आहेत. एका टूलकिटनुसार त्यांचा प्रचार सुरु आहे, परंतू त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असे जावडेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांची भोरमध्ये “सर्जिकल स्ट्राइक”; शरद पवार गटाला मोठा धक्का
-पुण्याला सभेसाठी जाताना शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
-Sholay | साऊथच्या ‘या’ चित्रपटाने दिली थेट ‘शोले’ला टक्कर; बॉक्स ऑफिसवर थलापथीचा धमाका
-Lok Sabha | ‘मतदानाच्या दिवशी कामगारांना फुल पगारी सुट्टी द्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
-हडपसरमध्ये आढळराव पाटलांची सरसी, रॅलीला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद