पुणे : पुणे शहरात कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणीनगर अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी ९ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यात यावा, असा अर्ज सरकार पक्षाकडून न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
या अपघात प्रकरणातील आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करुन खटला सुरु करण्यात यावा यासाठी या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडिल बिल्डर विशाल अग्रवाल, आई, शिवानी अग्रवाल (दोघे रा. वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, मोटारीतील सहप्रवासी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्ताचे नमुने देणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे, रा. घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. विमाननगर) यांच्याविरुद्ध खटला सुरू करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्या प्रकरणी मुलांचे पालक, ससूनमधील डॉक्टरांसह ९ आरोपींंविरुद्ध आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निघावे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, अशी मागणी सरकार पक्षाने आम्ही केली आहे, असे विशेष सरकारी वकील ॲड. शिशीर हिरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा
-“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार
-‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप
-निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात
-भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?