पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचा हात असल्याच्या चर्चा होत्या. या सर्व प्रकरणावरुन सुनील टिंगरे यांची तब्बल ४ तास चौकशी झाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केले. मात्र, या चार्जशीटमध्ये सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याचे आता समोर आले आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सुनील टिंगरे यांनी मदत केली असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. या कार अपघातातील आरोपी हा अल्पवयीन असून त्याचे वडील हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. याच अग्रवाल यांना मदत करण्यासाठी सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा देखील आरोप सातत्याने करण्यात येत होता. यावरुन टिंगरे यांची चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, अजित पवार गटाचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस चौकीमध्ये येऊन आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील झाला होता. त्यातच आता न्यायालयात दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रामध्ये टिंगरे यांचे नाव नाही. मात्र, पुरवणी आरोपपत्रामध्ये टिंगरेंचे नाव घेणार का? आणि या पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिणाम दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?