पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चत असणाऱ्या परिविक्षाधीन (प्रोबेशनल) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर आले आहेत. त्यातच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशीतील शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखून दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता शेतकऱ्यांवर पिस्तुल दाखवत दमदाटी करणे मनोरमा खेडकर यांना चांगलंच महागात पडलं आहे.
मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. मनोरमा खेडकर महडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळावी होती. त्यानंतर पौड पोलिसांनी कारवाई करत मनोरमा खेडकरला अटक केली आहे. मनोरमा खेडकर यांना आता पुण्यात आणण्यात येत आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्या निवडीबाबतच्या कागदपत्रांवरून देखील अनेक आरोप केलेले आहेत. त्या सर्व कागदपत्रांची सध्या चौकशी सुरु आहे. गेल्या वर्षभरापूर्वी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने एक वादाची जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते. हा व्हिडीओ पूजा खेडकर यांच्या कारनाम्यानंतर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’
-शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा
-विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?