पुणे : टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला. या सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेत टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट टीम मायदेशी परतली अन् संपूर्ण भारतवासियांनी टीम इंडियाचे जंगी स्वागत केले. सर्व स्तरातून कौतुकाचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे या महाराष्ट्राच्या ४ खेळाडूंचा विधानभवनात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यातच विधानसभा सभागृहामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुर्यकुमार यादववर मिश्किल टोला लगावला आहे.
सुर्यकुमार यादवने तो झेल पकडला नसता तर रोहित शर्माच नाही तर आम्ही सर्वांनीच त्याला बघितले असते, अशी खुमासदार टिप्पणी अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी सूर्यकुमारने अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात सीमारेषेजवळ डेव्हिड मिलरच्या घेतलेल्या थरारक कॅचचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सूर्यकुमार यादवने तो झेल टिपला नसता तर आजचा दिवस तुम्हा-आम्हाला दिसला नसता. त्याचे खूप खूप कौतुक….रोहित म्हणाला तसा, तू कॅच घेतला नसता तर तुला बिघतलेच असते. पण रोहितने एकट्याने त्याला बघितले नसते, आम्ही सर्वांनीच तुला बघितले असते. कारण, आमचे लोक फार वेडे आहेत. ते जिंकल्यानंतर टोकाचा उदोउदो करतात आणि हरल्यानंतर दगड फेकून मारण्यासही कमी करत नाहीत. कारण, आपल्याकडे खिलाडूवृत्ती पाहण्यास मिळत नाही’, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेची तयारी! ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
-रिक्षा चालकांसाठी आमदार सिद्दार्थ शिरोळेंनी विधानसभेत केली ‘ही’ महत्वाची मागणी
-ऑन ड्युटी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकलं पेट्रोल अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?
-‘आता सर्वांना वारीच्या पालखीत फिरायचंय, पण…’; अजित पवारांचा शरद पवारांना टोला