पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. त्यातच महायुतीचे मित्रपक्ष आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ८ ते १० जागांवर दावा केला आहे. कॅबिनेटमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व काही सुरळीत चाललं आहे. कुणीही नाराज नाही, असेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे. रामदार आठवले हे लोणावळ्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.
‘लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. तरी जोमाने काम करत असून नाराज नाही, असेही आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं. लोकसभेत आम्हाला अपयश आलं, कारण इंडिया आघाडीने संविधानाच्या मुद्द्यावरून मतदारांना ब्लॅकमेल केले’, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
‘कॅबिनेटमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अजिबात नाराजी नाही. महायुती आजही बळकट आहे. लोकसभेबाबत माझीही नाराजी होती. ती बाजूला ठेवून महायुतीमध्ये राहिलो आणि जोमाने कामाला लागलो. राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मंत्रीपद देणार आहेत. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. विधानसभेत आमचा ८ ते १० जागांवर दावा आहे. त्या मिळतील अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत वाद? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नाही तर…’
-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
-अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर
-रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा; घेतली अजित पवारांची भेट, म्हणाल्या, ‘दादा…’
-रोहित पवारांच्या ट्विटची महाराष्ट्र पोलीस विभागाने घेतली दखल; पोलीस भरतीबाबत ‘हा’ मोठा निर्णय