पुणे : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये राजकीय नेत्यांचे मोबाईल फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुप्रिया सुळे या कायमच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असतात. अशातच त्यांचा मोबाईल हॅक झाल्याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. आज दुपारी सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि कार्यकर्त्यांना तसेच जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या ‘त्या’ चुकीमुळे नाराज आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
-Big Boss Marathi: निक्कीनंतर रितेश भाऊ घेणार ‘या’ स्पर्धकाची शाळा
-पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र
-अरविंद शिंदेंचा मास्टर प्लॅन; ठाकरेंचा शिवसैनिक गळाला लावत बागवेंवर मोठी कुरघोडी