पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल झाल्याचे पहायला मिळाले. विधानसभेत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे पक्षापासून काहीसे अलिप्तच राहिले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावरुन ते लवकरच शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पुणे शहर काँग्रेसमध्ये करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ७ विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक नेमण्यात आले. या नियुक्त्यांमधून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आले. आता अशातच आता धंगेकरांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून त्यांनी शिवसेना पक्षप्रवेशाबाबत संकेत दिलं आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
काय आहे रवींद्र धंगेकरांचे व्हॉट्सअप स्टेटस?
रवींद्र धंगेकरांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये त्यांनी गळ्यात भगवा परिधान करुन स्वत:चा फोटो स्टेटसला ठेवला आहे. या स्टेटसला ‘शाह का रुतबा’ हे गाणे ठेवले आहे. “तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गयी जर, हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी… तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही” हे गाणे स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना सूचित इशारा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्वकीयांना डिवचण्यााठी हे स्टेट्स असल्याचे देखील बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर पुणे काँग्रेसने कसबा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार धंगेकरांकडे न सोपवता अभय छाजेड यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी डिवचण्यासाठी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता जोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल
-Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल
-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच