पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातून पिंपरी पोलिसांनी काल (शुक्रवारी) २ किलो २० ग्रॅम ड्रग्ज साठा जप्त केला. या ड्रग्जची किंमत तब्बल २ कोटी २ लाख १० हजार रुपये इतकी आहे. पिंपरी पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले त्याचबरोबर आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी आता धकक्कादायक माहिती समोर आली आहे.
हॉटेल कामगाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले आहे. उपनिरीक्षकाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी नमामी हा एका हॉटेलमध्ये कामाला आहे. या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका उपनिरीक्षकाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपी नमामी याला पिंपळे निलख विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्रीसाठी आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्याच्या कडील सफेद रंगाच्या पिशवीत २ कोटी २ लाख रुपये किमतीचे एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी चिंचवड पोलिसांकडून २ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त
-पुण्यात पाणी कपात; बुधवारी शहरातील ‘या’ परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
-मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”
-“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा
-फडणवीसांनी शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण नाकारलं; म्हणाले, ‘आग्रही निमंत्रणाला..’