पुणे : चिंचवड शहरातील रक्षक चौकात २ कोटी रुपयाचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज नुकतेच पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात नमामी झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या गंभीर गुन्ह्यात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके या पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आले आहे. विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे फौजदार शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून २ कोटी २ लाख रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नमामी झा याला अटक करण्यात आली. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ड्रग्जच्या प्रकरणात थेट पोलिस उपनिरीक्षकाचाचा सहभाग असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (१ मार्च) पहाटे साडे ४ च्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. तेव्हा नमामी शंकर झा याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. मात्र, पुढे जाऊन या प्रकरणात फौजदार शेळके याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाल्याने एकच गोंधळ उडाला. अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केलेल्या कसून चौकशी नंतर फौजदार शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली असून, त्यानंतर त्याच्याकडून ४४.५० किलो एमडी जप्त करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष
-सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमचं सरकार राजकारण विरहित”
-“तरुणांना रोजगाराची गरज, राजकारण सोडून एकत्र यावं”; ‘नमो महारोजगार मेळव्या’त शरद पवारांचं वक्तव्य
-शिरुर लोकसभेत आयात केलेल्यांना उमेदवारी देणार असाल तर….; विलास लांडेंचा अजितदादांना इशारा
-Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण