पुणे : पुणे शहर हे विद्येचे माहेर घर म्हटलं जात, तसेच पुण्याला सांस्कृतिक वारसा आहे. या सुसंकृत पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरामध्ये आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न होता पण आता शहरात अशा काही घटना घडत आहेत की त्यावरुन सामान्य जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच आता संरक्षण पुरवण्याची गरज आहे. कारण गुन्हेगार इतके निर्भिड झाले आहेत की सर्रास पोलिसांवरच हल्ला करत आहेत.
काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर चेकींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल (Petrol) ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातच आता चेक पॉइंटवर गाडी अडवल्याचा राग आला आणि नोकरी कशी करतोय तेच बघतो म्हणत थेट पोलिसांनाच मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पुणे शहर निदान पोलिसांसाठी तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न सहजपणे पडत आहे.
सिंहगड रोडवर रविवारी वाहतूक हटविण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड गेले होते. गायकवाड यांच्याशी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी या दोघांनी बाचाबाची केली. ‘मी कोण आहे? तुला माहीत नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो’, असे म्हणत पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर दुसरे अंमलदार मदतीसाठी गेले असता, त्यांनादेखील मारहाण केली. या प्रकरणी आता मारहाण करणाऱ्या दळवी आणि फडके यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 121 (1), 132, 351 (2), 351 (3), 352 नुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भास्कर जाधवही संतापले; म्हणाले, “चेंबरमध्ये बसून लोकांचे…”
-अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात येणार? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
-वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’