पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव वेगाने अलिशान कारमधून जाताना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. न्यायालयाने १५ तासांच्या आत आरोपी वेदांत आगरवाल याला जामीन मंजूर केला. या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणला गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हे प्रकरण खूप गंभीर आहे त्यामुळे गांभीर्याने पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणात 304 अंतर्गत कलम लावण्यात आले आहे. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. हा आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी केली होती, आमची मागणी फेटाळले आहे. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत”, असं अमितेश कुमार म्हणाले आहेत.
आरोपी मुलाच्या आई आणि वडिलांवर तसेच दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्स्ईज डिपार्टसोबत काम करण्यात येणार आहे. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी थातुरमाथूर कारवाई केली असे नाही त्यामुळे कोणीही असे समजू नये. कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला असल्याचेही अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
“या प्रकरणात पोलीस ठाण्यातील सी. सी. टी. व्ही. फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातून समजेल. आणि ते सर्वांच्या पुढे येईल. आज अनेक सामाजिक आणि राजकीय लोक भेटत आहेत. त्याचे म्हणणे पण ऐकून उपाय केल्या जातील.”
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुढील ४ दिवस पावसाची जोरदार शक्यता; हवामान खात्याने दिले अपडेट…
-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर
-Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…
-आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे