पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये रोज रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलिसांकडून शहरामध्ये एकूण २७ ठिकाणे निश्चित केली असून मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरातील २७ ठिकाणांवर पोलिसांनी नाकबंदीची कारवाई करण्यात येत असून सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. या नाकाबंदी करावाईमध्ये दरम्यान रोज रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. बेशिस्त वाहन चालक तसेच मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
‘वाहतूकीचे नियम भंग करणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे’, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. तसेच ब्रेथ अॅनलाइझरद्वारे तपासणी करण्यात येत असून संशयित वाहन चालकाची तपासणी केल्यानंतर वापरलेली नळी ही बदलण्यात येणार असून तपासणी केलेल्या नळ्या नष्ट केल्या जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; राहुल कलाटेंनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट
-खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींसह चौघे ताब्यात; शहाजीबापू पाटील अडचणीत, नेमकं काय कनेक्शन?
-Pune: बागवे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत? व्हिडीओ शेअर करत थेट सांगितलं…
-अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?