पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून सध्याची तरुणाई ही सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह असल्याचे पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना मुक्त व्यासपीठ मिळाल्याने कोणतीही पातळी गाठून आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. अशातच आता दोन तरुणांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट करण चांगलंच भोवलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत.
रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील “राजकारण महाराष्ट्राचे” या पेजवरून वारंवार जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींवरुन पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम ७८, ७९, ३५१(३), ३५१(४), ६१(२) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपी आकाश दिगंबर डाळवे (वय ३०, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अविनाश बापू पुकळे (वय ३०, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली. या दोघांना आज गिरगाव येथील १८ व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण ९ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…
-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे
-सावंतांच्या लेकाला बँकॉकला जाण्यासाठी ६८ लाख, पण तुम्हाला जायचं असेल तर किती खर्च?