पुणे : पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात असणाऱ्या एका स्पा सेंटरमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यावेळी ४ तरुणींची सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन छापा टाकण्यात आलेल्या ‘स्पा’ सेंटरच्या महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलं आहे. निगडीतील फोनिक्स ‘स्पा’वर ही कारवाई करण्यात आली. निगडीमध्ये ‘इन्स्पिरिया’ मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या ‘स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर फोनिक्स ‘स्पा’मध्ये डमी ग्राहक पाठवला. तिथं वेश्याव्यवसाय केला जातो का? याची शहानिशा पोलिसांनी केली. अतिशय चोखपणे सापळा रचून ‘स्पा’वर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून ४ तरुणींची सुटका करण्यात आले. तसेच ‘स्पा’ महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ता या पोलीसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळमधून श्रीरंग बारणे हेच महायुतीचे उमेदवार; भाजपचं बंड शमलं
-पुण्यात ‘हे’ असणार काँग्रेस उमेदवार; चंद्रकांत पाटलांनी थेट नावच सांगितलं
-‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य