पुणे : पुणे शहर पोलिसांनी शहरात धडक कारवाया सुरु केल्याच पहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी ‘ड्रग्ज फ्री पुणे’ या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात येते आहे. या ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी पोलिसांची १० पथके तैनात केली आहेत. पुणे शहर पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात मोठी कारवाई केली असून आरोपीकडून १० लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एका अज्ञाताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय-३८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
पिंपरी- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्का; मावळच्या मैदानात जोरदार लढत होणार!
-पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त
-आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल
-लाचप्रकरणी नाव आल्यानंतर मुगुट पाटलांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी बदली
-पुण्याचा दादा कोण?; रोहित पवारांच्या बॅनरची राजकारणात मोठी चर्चा